महिलांच्या सतर्कतेने वाघापासून वाचले महिलेचे प्राण!
मरारमेंढा शेत शिवारातील घटना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- काळ आला होता मात्र वेळ असली नव्हती या वाक्प्रचार प्रमाणे तालुक्यातील मारारमेंढा गावालगत शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर वाघाने हमला केला.या घटनेच्या वेळी पीडित महिले सोबत तिची जाऊबाई व बाजूच्या शेतात काही महिला काम करत होत्या त्यांनी आरडाओरड करत व आपल्या जवळील वस्तू वाघावर भिरकावाल्याने वाघ घाबरून महिलेला जखमी करून पडून गेल्याची घटना घडली.
ब्रम्हपुरी तालुक्यातील मारारमेंढा येथील वर्षा विलास वलके वय 38 व त्यांच्या जाऊबायी प्रतिभा प्रकाश वलके या दोघी जणी दिनांक 29 नोव्हेंबर ला गावा जवळच असलेल्या शेतात काम करत होते.दुपारची 12 च्या दरम्यान वर्षा वलके या कुटाशी उडवत असताना यांना समोर एक वाघ दिसला.काही कळायचे आत वाघाने वर्षा यांचेवर झेप घेत जखमी केले.वर्षा यांचे किंचाडल्याने काही अंतरावर काम करणाऱ्या त्यांच्या जाऊबायी प्रतिभा यांनी आरडाओरड करत धाव घेतली याच वेळी लगतच्या शेतात काम करणाऱ्या महिला सुद्धा आरडाओरड करत धावल्या.
महिलांनी आरडाओरड करत हातामध्ये जे येईल ते वाघावर भिरकावल्याने वाघ घाबरून वर्षा यांना जखमी करून पडून गेला.या वेळी उपस्थित महिलांनी प्रसंगावधान दाखवत पडून न जाता हिमतीने वाघाचा सामना केल्याने वर्षा यांची वाघाच्या पांज्यातून सुटका झाली व त्यांचे प्राण वाचले.
या घटनेत वर्षा वालके यांच्या डोक्याला व मानेला तीन ते चार इंच वाघाच्या पांज्याचे जकमा झाल्या.त्यांना तातडीने ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.तेथील उपचारानंतर दिनांक ३ डिसेंबर उपचारानंतर सुटी देण्यात आली असल्याची माहिती ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ खंडाळे यांनी पुण्यनगरी शी बोलताना दिली.