Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ऑपरेशन मुस्कान मोहीम सहा वर्षापूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीस ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 फिर्यादी यांनी दि. 24/12/2018 रोजी पोलीस स्टेशन दहेगाव येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 15 वर्षे हिला दि.23/12/2018 रोजी अंदाजे राञ दरम्यान यातील संशयीत आरोपी कवड्डु उर्फ प्रदिप गोंविदराव मेंढे रा. कोपरा (चानकी) फूस लावुन पळवून नेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन दहेगाव (गोसावी) येथे अप क्र. 117/2018 कलम 363 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तथा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्फतीने करीत असताना मा. श्री अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात पथक तयार करण्यात आले. सदर गुन्ह्यात मुखबिर लावून व तांत्रिक तपास करून यातील संशयीत आरोपी याचा शोध घेण्यात आला. यातील संशयीत आरोपी नामे कवडू उर्फ प्रदीप गोविंदराव मेंढे रा. कोपरा (चानकी) याने अल्पवयीन मुलीस पिपलागड मध्यप्रदेश येथे नेवून वास्तव्य करीत आहे व आज दिनांक 03/12/2024 रोजी आरोपी हा त्याचे घरी परत येत असल्याची माहिती मिळताच आरोपीचे घरी जाऊन शोध घेतला असता यातील पीडित अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले. यातील अल्पवयीन मुलीस रीतसर कायद्याप्रमाणे पो. स्टे, दहेगाव यांच्याकडे देण्यात आले आहे. आरोपी फरार असून पुढील तपास पो स्टे दहेगाव करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे प्रत्यक्ष हजेरीत स. फौ. सुभाष राऊत, पो. हवा. नितेश मेश्राम, म.पो.हवा. शबाना शेख, पो.शि. नवनाथ मुंडे असे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा आणि पो. हवा. अक्षय राऊत, गोविंद मुंडे सायबर सेल वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये