Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

गुंतवणुकीचा मिळणार जास्त परतावा मिळणेसंबंधात फिर्यादीची ऑनलाईन फसवणूक

संपुर्ण मुद्देमाल जप्त ; आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी कु. खुशी निलेश पोहेकर, रा. वर्धा यांना त्यांचे मोबाईलवर व्हॉट्स अॅप्स व्दारे कोटक महिंद्रा बँकेमध्ये ट्रेडींग करून कमी पैशाची गुंतवणुक करून जास्त रकमेचा परतावा मिळविणेसंबंधात संदेश प्राप्त झाला होता. त्यात फिर्यादी यांना त्यात गुंतवणुक करायची असल्याने त्यांचे मो.क. वर व्हॉट्स अॅप्स व्दारे प्राप्त लींक व्दारे kotak neo नावाचे अॅप फिर्यादी यांनी डाउनलोड केले.

त्यानंतर प्रथम फिर्यादी यांनी भिम अॅप्स व्दारे १०,०००/- रू ची गुंतवणुक केली, प्रती दिवस १० टक्के नफा मिळेल असे फिर्यादींना सांगितले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी जास्त परतावा मिळेल या आशेने एकुण २,१५,०००/- रू वळते केले होते. परंतु फिर्यादी यांना परतावा न मिळाल्याने रक्कम विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला असता विड्रॉल होत नव्हते. त्यासंबंधात फिर्यादी यांनी विचारणा केली असता ईतर गुंतवणुकदारांनी लोन घेतले आहे. ते फेडल्याशिवाय विड्रॉल करू शकत नाही असे सांगितले. त्यावेळी फिर्यादींना लक्षात आले की, जास्त परतावा मिळेल असे आमीष दाखवुन २,१५,०००/- रू ने आर्थीक फसवणुक केली अशा आशयाचे फिर्यादीचे तकारीवरून सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे अप क ३६/२४ कलम ३१८ (२), ३१८(४) बी.एन.एस. सह कलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये दि. ०१.१०.२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात तांत्रीक विश्लेषणावरून फिर्यादी यांची फसवणुक झालेल्या रकमेपैकी १,००,०००/- रू सिराज बक्श रा. भोपाळ (म.प्र.) या नावाचे व्यक्तीचे बँक खात्यात वळते झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून आरोपी सिराज जहीर बक्श, वय २२ वर्षे, रा. कुमारपुरा, फरहान मस्जीद जवळ, जहागिराबाद, भोपाळ (म.प्र.) यास दि. ०३.१२.२०२४ रोजी भोपाळ (म.प्र.) येथुन ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आली व आरोपीचे ताब्यातुन १ मोबाईल व नगदी १,००,०००/- रू असा एकुण १,१०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी सदयस्थितीत पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन गुन्हयाचा पुढील तपास श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक, सायबर पो.स्टे. वर्धा हे करीत आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक सा. वर्धा, मा. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे मार्गदर्शनात श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थागुशा/सायबर पो.स्टे., पो.हवा./अनुप राऊत, निलेश तेलरांधे, अमित शुक्ला, वैभव क‌ट्टोजवार, रणजित जाधव, अनुप कावळे, अक्षय राऊत पो.शि./पवन झाडे, प्रतिक वांदीले, म.पो.शि./ लेखा राठोड, आरती पारीसे सर्व नेमणुक सायबर पो.स्टे. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये