Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून जामणी येथील शाळेची दुरुस्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ ने आपल्या सी.एस.आर. फंडातून जामणी गांवातील जिल्हा परिषद शाळेची इमारत दुरुस्ती चे काम जामणी ग्रामपंचायत चे सरपंच जगदीश किन्नाके व मुख्याध्यापक बेरड सर यांच्या मांगणीला प्राधान्य देत सुरु केलेत.

आज या कार्याचे भूमिपूजन सरपंच जगदीश किन्नाके यांच्या हस्ते नारळ फोडून व कुदल मारून करण्यात आलेत.

या वेळी माणिकगडचे सुरक्षा प्रमुख मानस बेहरा, सी.एस.आर. प्रमुख राजीव रंजन व मुख्याध्यापक बेरड सर यांच्या हस्ते सुद्धा भूमिपूजन करण्यात आलेत तर यावेळी गांवातील नागरिक, शिक्षक तसेच विध्यार्थी उपस्थित होते.

या दुरुस्ती मध्ये शाळा इमारतीचा पायवा दुरुस्ती करणे, शाळेचे गेट दुरुस्ती करणे, शाळे समोरील पटांगण मजबूत करणे, इमारतीला असलेले क्रॅक्स दुरुस्ती व विध्यार्थी शौचालय दुरुस्तीचे काम होनार असे प्रतिपादन सी.एस.आर प्रमुख राजीव रंजन यांनी केलेत.

सरपंच व शिक्षकांनी माणिकगडचे या दुरुस्ती बद्दल मनापासून आभार मानलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये