Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिन्दु हृदयसम्राट बाळासाहेबाचे ब्रिदवाक्या प्रमाणे : 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण, अंगीकृत करा – रविंद्र शिंदे

वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात युवकांनी बांधले शिवबंध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मला अभिमान : रविंद्र ‍ शिंदे

     पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षानी रविंद्र ‍शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवीत वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली. याला अनुसरुनच पक्ष संघटण वाढीसाठी भद्रावती तालुक्यातील पदाधिकारी तालुका प्रमुख नंदू पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना तालुका प्रमुख राहुल मालेकर, युवासेना शहर प्रमुख गौरव नागपूरे व शिवसैनीक हे सुध्दा रविंद्र शिंदे यांच्या खाद्याला खांदा लावून पक्ष संघटनेचे कार्य जोमाने करीत आहेत. याचेच फलीत आणि युवासेनेचे प्रमुख तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विचाराशी प्रेरित होऊन भद्रावती तालुक्यातील शेकडो युवा आज घडीला मोठया प्रमाणात नेतृत्वावर विश्वास दाखवीत स्वता जुळत आहेत, शिवबंध बांधीत पक्षात प्रवेश करीत आहेत.
हिन्दु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रिदवाक्य आहे, की 80 टक्के समाजकारण करा आणी 20 टक्के राजकारण करा, हया शब्दांची आठवण करुन देत रविंद्र शिंदे यांनी नविन कार्यकत्यांनमध्ये समाजकारण व राजकारणाची जोड बसवीत एकप्रकारची उर्जा निर्माण केली. याप्रसंगी भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल व युवासेना तालुका प्रमुख राहुल मालेकर व पदाधिकारी यांच्या पक्ष संघटनेकरीता रात्रदिवस सोबत करीत असलेल्या कार्याचा उल्लेख करीत यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन सुध्दा दिले.
याप्रसंगी भद्रावती शिवसेना तालुकाप्रमुख व नगरसेवक नरेंद्र पढाल व युवासेना तालुका प्रमुख राहुल मालेकर यांच्या नेतृत्वात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय “शिवालय” येथे भद्रावती तालुक्यातील बेलगाव व पिरली गावातील साहिल टोंगे, महेश येरगुडे, प्रतीक टोंगे, गौरव झाडे, राहुल टोंगे, अक्षय बदकी, गणेश झाडे, आकांशू टिपले, अनुप डाखरे, अथर्व हेलवटे या युवकांचे शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्याला पदाधिकारी यांच्या सोबतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना भद्रावती तालुका अध्यक्ष राहुल मालेकर, युवासेना भद्रावती शहर प्रमुख गौरव नागपूरे, रोहण कुटेमाटे, अरुण घुगुल, जेष्ठ शिवसैनीक, युवा शिवसैनिक, वरोरा तालुक्यातील युवासेना नवनियुक्त पदाधिकारीसह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये