ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निळकंठराव शिंदे महाविद्यालयात शेती विषयक मार्गदर्शन

शेतकऱ्यांच्या विविध समस्येचे निराकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

नुकतेच निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती येथे राष्ट्रीय सेवा योजना व हायमीडिया लेबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने भद्रावती परिसरातील शेतकऱ्यांकरिता शेती विषयक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला हायमीडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडचे एस. के. सिंग, डॉ राजेश पाल , चेतन ऍग्रो पानवटी वर्धेचे जय व्यास , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ गजेंद्र बेंदरे , डॉ सौ ए बी धोटे उपस्थित होते.

या वेळी डॉ. राजेश पाल यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस यांच्या पेरणीच्या वेळेस तसेच नंतर घ्यावयाची काळजी याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. जय व्यास यांनी त्यांना आलेले अनुभव याप्रसंगी उपस्थितांना सांगितले. एस के सिंग यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्येचे निराकरण केले.

या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ गजेंद्र बेदरे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक कुलदीप भोंगळे यांनी केले.
या कार्यक्रमाला भद्रावती परिसरातील चोरा, चिरादेवी, मांगली, पीरली अशा विविध खेडे गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये