ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोतवाल भरती मध्ये गैरप्रकार झाल्याने पूनरपरिक्षा घ्या!

परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा पत्रपरिषदेत आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- येथे दि. १५ ला झालेल्या कोतवाल भर्ती परीक्षा मध्ये केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत झालेली परीक्षा रद्द करून पूनर परीक्षा घेण्याची मागणी परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी आज दि. १६ ला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृह मध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.सदर बाबतीचे निवेदन उपविभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी यांना पाठवल्याचे माहिती दिली.
       ब्रह्मपुरी येथे झालेल्या कोतवाल भरतीत गैरप्रकार घडून आले आलेला आहे. सदर कोतवाल भरतीची परीक्षा दि. १५ जून ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे घेण्यात आली.परीक्षा केंद्रावर काही परीक्षार्थीनी उत्तर पत्रिकेवर फक्त  रोल नंबर लिहून परिक्षकांकडे दिल्या.काही परीक्षार्थी त्यांचे रोल नंबर चुकले असता त्यांना दुसरे उत्तर पत्रिका देण्यात आले.या सोबतच याच दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पेपर उत्तम गेले त्यांना कमी मार्क देऊन डावलण्यात आले तर ज्यांनी कोऱ्या उत्तरपत्रिका दिल्या त्यांची निवड झाल्याचा विद्यार्थ्यांनी पत्रपरिषदेत आरोप केला आहे
      परीक्षा मध्ये ज्यांनी आर्थिक देवाण घेवाण केली त्या विद्यार्थ्याची निवड झाल्याचा आरोप करत सदर ची परीक्षा तत्काळ रद्द करावी व नव्याने परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास आपण आमरणउपोषण करणार असल्याची माहिती या वेळी विद्यार्थ्यांनी केली.पत्र परिषदेला मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी विद्यार्थ्यां उपस्थित होते.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये