Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

विश्वशांती विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्व शांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे संविधान दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आले.

संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार तर प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक शरदचंद्र पोहनकर,ज्येष्ठ शिक्षक संजय ढवस,किशोर संगिडवार,शेखर प्यारमवार,राजू केदार,धर्मेंद्र दुधे,राजश्री बिडवई यांनी उपस्थित राहून भारतीय संविधानावर प्रकाश टाकला तसेच शालेय विद्यार्थ्यांनी संविधानाच्या महत्वावर भाषणे दिली.

आयोजित कार्यक्रमाचे संचालन धनंजय गुरनुले तर आभार सहाय्यक शिक्षक सुधीर जीवतोडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये