Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावती येथे भव्य संविधान सन्मान रॅलीचे आयोजन

शहरात संविधान दिन उत्साहात साजरा

चंदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

         संविधान सोहळा समिती भद्रावतीच्या वतीने शहरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचीत्य साधून दिनांक 26 रोज मंगळवारला सकाळी साडेदहा वाजता शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. सदर रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून मुख्य रस्त्याने बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापर्यंत पोहोचून परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली.

रॅलीत पथनाट्य, संविधान जागरूक देखावे, लेझीम पथक, बँड पथक, आदिवासी सांस्कृतिक नृत्य आदींचा समावेश होता. सदर रॅलीत शहरातील सर्व सामाजिक व राजकीय पदाधिकारी, शाळांमधील शिक्षक तथा विद्यार्थी, सामाजिक संघटना तथा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संविधान दिना निमित्त सायंकाळी सहा वाजता डॉक्टर आंबेडकर चौकात बहुजन शायर दिल्ली यांच्या संविधान प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये