Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कविता जीवनाचा आरसा आहे – इमरान राही 

अर्चना धानोरकर व ऋचा वगरकर मांजरखेडे उत्कृष्ट कवियत्री पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘कवी आपल्या रचनेत जीवनाचे सत्य कथन करतो. मानवी जीवन सुख-दुःख, उतार-चढाव, यश-पराभव, बेरीज-वजा या समीकरणाने बनलेले आहे. म्हणून कवीने लिहिलेल्या कविता जीवनाचा आरसा आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी तथा उर्दूचे शायर इमरान राही यांनी स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयातील एनसीसी विभागातर्फे आयोजित आई या विषयावरील कविता लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात 24 नोव्हेंबर रोजी एनसीसी सभागृहात केले.

एनसीसीच्या 76 व्या स्थापना दिनानिमित्त स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयातील एनसीसी युनिटने प्रश्नमंजुषा व कविता लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. पारितोषिक वितरणाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उर्दू शायर इमरान राही तर प्रमुख अतिथी म्हणून राजू लभाने, अर्चना धानोरकर, ऋचा वगरकर मांजरखेडे व एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत कॅडेट सौरभ साव व नयन तुमसरे या परम चक्र विजेते रायफल मॅन संजय कुमार या संघाला प्रथम पुरस्कार तर सार्जंट खुशी पचारे व कांचन राऊत या शहीद परमवीर चक्र विजेते विक्रम बत्रा या संघाने तसेच कॅडेट पायल चौके व अनुश्री खंडारे या परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंग यादव संघाने द्वितीय पुरस्कार पटकावला. तृतीय पुरस्काराचे मानकरी अंडर ऑफिसर आदर्श नाईक व सार्जंट मनोज नेहारे या शहीद परमवीर चक्र विजेते कॅप्टन मनोज पांडे या संघाने मिळविला.

‘आई’ या विषयावर कविता लेखन स्पर्धेत हिंगणघाट ची जान्हवी वानखेडे हिला रु. 501/- रोख व प्रशस्तीपत्र देऊन प्रथम पुरस्काराने तर अल्लीपूर च्या शेखर धोंगडे रु. 401/- रोख व प्रशस्तीपत्र देऊन द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या तिसऱ्या पुरस्काराने यवतमाळची रश्मी खोके व एस एस एन जे महाविद्यालयाची प्रतीक्षा पाटमासे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. प्रोत्साहन पुरस्कार कॅडेट पायल चौके हिने पटकावला.

याप्रसंगी उत्कृष्ट कवियत्री म्हणून यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यापिका अर्चना धानोरकर व नागपूर येथील भारती कृष्णा विद्या विहार विद्यालयाच्या अध्यापिका तथा आकाशवाणी च्या उद्घोषक ऋचा वगरकर मांजरखेडे यांना एनसीसी दिनानिमित्त स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी, संचालन सार्जंट कोमल शितळे तर आभार अंडर ऑफिसर श्रद्धा मडावी हिने मानले.

कार्यक्रमाची सांगता ‘हम सब भारतीय है’ या एनसीसी गीताने झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये