Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठात ‘स्केचिंग अँड रेंडरिंग’ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा

विद्यार्थिनींचा उत्स्फूर्तपणे सहभाग

चंदा ब्लास्ट

  एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई चे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे १९ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘स्केचिंग अँड रेंडरिंग’ या विषयावर बी.ए. (फॅशन डिझाईन) आणि बी. वोक. (इंटरियर डिझाईन) विद्यार्थिनींसाठी एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ह्या कार्यशाळेसाठी २२वर्षे कला(फाईन आर्ट्स)विषयाचा अनुभव असलेले प्रा. स्वरुप रंगारी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. रंगारी यांचे शिक्षण फाईन आर्ट्स मध्ये झाले असून ते सध्या द आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवारपुर, जि. चंद्रपूर येथे कार्यरत आहे.

प्रा. रंगारी यांनी खूप सोप्या पद्धतीने स्टील लाईफ ड्रॉईंग, रेंडरिंग, कलरिंग, आणि परस्पेक्टिव्ह ड्रॉईंग बद्दल डेमो देखील दिला. कार्यशाळेचे आयोजन सहा. प्रा. प्रणाली गौरकर यांनी केले. एस. एन.डी. टी.महिला विद्यापीठ मुंबई, बल्लारपूर कॅम्पसचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींना प्रोत्साहित करत आपल्या कलागुणांना वाव देण्याचे आव्हान केले.

कार्यशाळेत विद्यापीठातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यक्रमाला एस. एन. डी. टी.महिला विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर बाळू राठोड आणि समन्वयक वेदानंद अलमस्त यांची विशेष उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहा. प्रा. शितल गडेकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये