ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर मुलींच्या शासकीय आय.टी.आय चे नवे नाव राणी दुर्गावती आय.टी.आय. 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राणी दुर्गावती असे नाव देण्यात आले. या आयटीआयचा नामकरण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पार पडला.

     या संदर्भात पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता मंत्र्यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. राज्य सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शौर्याचे प्रतीक असलेल्या महान व्यक्तिमत्त्वांचे नावे दिल्याने भावी पिढीला तसेच तरुणांना प्रेरणा मिळेल, त्यांना आपल्या सामाजिक जबाबदारीची कायम जाणीव राहील ,असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

     राणी दुर्गावती या महान व्यक्तिमत्त्वाचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर (मुलींची) या संस्थेस देण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

       संस्थेस राणी दुर्गावती असे नामकरण रविवारी आभासी पद्धतीने सोहळा पार पडला. चंद्रपूर येथे मुलींच्या आयटीआय मध्ये नामकरण सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनंगीरवार, एम.आय.डी.सी.चे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा, संस्थेच्या प्राचार्य कल्पना खोब्रागडे तसेच संस्थेचे सर्व निदेशक, गटनिदेशक तसेच कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी एकमेकांना पेढा भरवून आनंद व्यक्त करण्यात आला .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये