ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आषाढी एकादशीनिमित्त विठू माऊलीच्या पालखी मिरवणुकीने शहरात भक्तिभावाचे वातावरण

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : आषाढी एकादशीनिमित्त घुग्घुस शहरात विठ्ठलनामाच्या जयघोषात भक्तिभावाने न्हालेली पालखी मिरवणूक पार पडली. जनाबाई निमकर यांच्या घरापासून विठू माऊलीची पालखी रविवारी सकाळी भक्तांच्या उपस्थितीत नगरात मिरवण्यात आली.

मिरवणुकीपूर्वी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे आणि प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे या दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठलमूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली.

शहरात भजन, कीर्तन, हरीनाम संकीर्तन आणि टाळ-मृदंगाच्या गजरात वातावरण भक्तिरसात रंगून गेले. पालखी मिरवणूक विठ्ठल मंदिरात पूजा करून गांधी चौक, पोलिस ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शेणगाव फाटा, पांढरकवडा मार्गे वढा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात समाप्त करण्यात आली.

विशेष म्हणजे, जनाबाई निमकर यांच्यातर्फे गेल्या १० वर्षांपासून ही पालखी मिरवणूक अखंडपणे आयोजित केली जात आहे.

या कार्यक्रमाला विवेक बोढे, किरण बोढे, जनाबाई निमकर, सखुबाई बोबडे, माया मांडवकर, अमोल थेरे, गणेश कुटेमाटे, प्रमोद भोस्कर, प्रेमलाल पारधी, चिन्नाजी नलभोगा, धनराज पारखी, लक्ष्मीताई चांदेकर, सरस्वती पाटील, गणेश राजूरकर यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगणांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये