ताज्या घडामोडी

माजी केंद्रीय मंत्री अमरसिंगजी तिलावत यांची, वसंतराव नाईक परसबागेला भेट व चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष,ऑल इंडिया बंजारा सेवा संघ,भारत अमरसिंग तिलावत यांनी नुकतीच नागपूर येथील मनिष नगर स्थित श्रीपतभाऊ राठोड आणि जयश्रीताई राठोड परिवाराने सिमेंटच्या जंगलात थेट इमारतीच्या चौथ्या मजल्यावर साकारलेल्या वसंतराव नाईक परसबागेला भेट दिली. राठोड परिवाराकडून त्यांचा यथायोग्य सत्कार करण्यात आला. कु. दिपाली राठोड आणि कु.अंजली राठोड यांचे ” परसबाग असावी दारी,, शिर्षकांखालील सादरीकरण झाले, त्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर कु. दिपाली राठोड व कु.अंजली राठोड द्वारा लिखित इंग्रजी भाषेतील पुस्तक ”वसंत बहार,,पुस्तकांवर चर्चा झाली.

मुक्त चर्चेत महत्वपूर्ण समाजोपयोगी विषयांवर चर्चा झाली.सौ. जयश्रीताई राठोड द्वारा स्वरचित काही गोरमाटी गीत गायनातून अनेक समस्यांवर प्रकाश टाकण्यात आले हे विशेष.या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अमरसिंग तिलावत यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.राठोड परिवाराचे प्रयोग समाजासाठी दिशादर्शी,मार्गदर्शक आणि अनुकरणीय असल्याचे आवर्जून प्रतिपादन करण्यात आले.या क्षेत्रात काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याचा राठोड परिवाराने संकल्प केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये