ताज्या घडामोडी

मौजा सुकळी व शिवनगाव शिवारात गावठी मोहा दारू भट्टीचे 02 अड्डे उध्वस्त

एकूण 10 लाख 13 हजारांवर माल नाश करून सदर 02 आरोपी विरुद्ध कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

थोडक्यात हकीकत या प्रमाणे आहे की, दि. 14/11/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेची पथके पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीर चे खबरे वरून पंच व पो स्टाफ सह यातील आरोपी प्रविण आत्माराम थूल, रा. सुकळी स्टेशन, ता. सेलू, जि वर्धा याचे *मौजा सुकळी स्टेशन सेलू* शिवारातील गावठी मोहा दारू चे अड्यावर प्रो.रेड केला असता त्यास पोलीस दिसताच पसार झाला मोक्यावरून जप्त मुद्देमाल 1) 35 प्लास्टिक ड्रममध्ये 100 लीटर प्रमाणे 3,500 लीटर कच्चा मोहा सडवा रसायन प्रती लिटर 100 प्रमाणे किं. 3,50,000/-रु.

3) 35 प्लास्टिक ड्रम प्रती नग 500/-रू प्रमाणे की. 17,500/-रू.

4) 10 लोखंडी भट्टीचे ड्रम की. 10,000/-रू.

4) इतर भटी साहित्य कि.5,000/-रु. असा जु.कि. 3,82,500/- चा माल जप्त केला तसेच *मौजा शिवणगाव सेलु* शिवारात आरोपी – शुभम पिंपळे रा. शिवणगाव याचे दारू भट्टीचे अड्ड्यावर रेट केला असता त्यास पोलीसची चाहूल लागताच पसार झाला मौक्यावरून जप्त माल 1) 30 लोखंडी ड्रम मध्ये प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे अंदाजे 6,000 लिटर कच्चा मोहा सडवा रसायन प्रति लिटर 100/-रु प्रमाणे किंमत 6,00,000/-रुपये

2) 30 लोखंडी ड्रम 1000/-रु प्रमाणे 30,000/-रू

असा एकुण किमंत 6,30,000/-रु. चा असा एकूण 10,13,000 रू चां माल नाश करून दोन्ही आरोपी विरुद्ध

 पो. स्टे. सेलू येथे कलम महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

  सदर कारवाई मा. श्री अनुराग जैन साहेब, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, नरेन्द्र पाराशर, भूषण नीघोट, मनीष कांबळे, संघर्ष कांबळे, अमोल नगराळे, सागर भोसले, नितीन इतकर, मिथुन जीचकार, मंगेश आदे, दीपक साठे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये