युवा सहकाऱ्यांसह राजकुमार डाखरे भाजपात!
देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत केला भाजप प्रवेश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
धनोजे कुणबी समाज सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे माजी युवा अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे समर्थक, DKPL या क्रिडा ग्रुपचे संस्थापक तसेच युवा उद्योजक श्री. राजकुमार डाखरे यांनी आपल्या राजुरा व चुनाळा येथील अनेक सहकाऱ्यांसह भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.
यावेळी देवराव भोंगळे यांनी सर्व नवप्रवेशितांच्या गळ्यात भाजपचे दुपट्टे टाकून त्यांचे भाजप परीवारात स्वागत केले.
या पक्षप्रवेशात राजुरा शहरातील गौरव आगलावे, विनोद निमकर, प्रशांत डाखरे, दिपक निखाळे, गणेश साळवे, योगेश निखाळे, शुभम कार्लेकर, शंकर साळवे, अनिकेत साळवे,पवन टोंगे तर चुनाळा येथील अजय मांडवकर, धनंजय पाचभाई, साहिल ठेंगळे, राकेश मोरे, हितेश येरणे, आशिष वांढरे आदींचा समावेश आहे.
राजुरा तालुक्यात युवा व्यावसायिक तसेच कुणबी समाजातील युवा नेतृत्व म्हणून सुपरिचित असलेल्या राजकुमार डाखरे यांच्या भाजप प्रवेशाने राजुरा शहरात भाजपची ताकद वाढली आहे. तसेच मागील पंधरवड्यात त्यांनी कोरपना, गडचांदूर, पेल्लोरा व कन्हाळगांव येथील पन्नास युवा कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश घडवून आणला होता; तर आज पुन्हा एकदा राजकुमार यांनी आपल्याबरोबर शेतकरी संघटना व कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांना भाजपची वाट दाखवल्याने आगामी निवडणुकीत भाजपला याचा चांगलाच फायदा होईल.