बामणवाडाचे कॉंग्रेसचे उपसरपंच अविनाश टेकाम सहकाऱ्यांसह भाजपात
देवराव भोंगळे यांच्या सेवाभावी व कनखर नेतृत्वाची जनतेला भूरळ - अविनाश टेकाम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथील कॉंग्रेसचे उपसरपंच अविनाश टेकाम यांनी ग्रा.पं. सदस्य प्रफुल चौधरी आणि त्यांचे युवा सहकारी संदीप मेश्राम, अजय कोडापे, मिथुन वाघमारे, आकाश आत्राम, राकेश सिडाम, गोलू कोडापे, शुभम कोडापे, आदित्य असारकर, निलेश सोयाम, संदेश सोयाम, प्रदीप टेकाम, अजय टेकाम, रसिक आत्राम, समीर आत्राम, वैभव टेकाम, शालू आत्राम, ईमलाबाई कोडापे, वर्षा कोडापे, राखीताई कोडापे, कमलाबाई अत्राम्म शबिता आत्राम यांचेसह काल (दि. १३) भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.
भाजप-महायुतीचे लोकप्रिय उमेदवार देवराव भोंगळे यांच्या प्रचार रॅलीदरम्यान हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून, सर्व नवप्रवेशितांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकून त्यांचे भाजप परीवारात स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलतांना उपसरपंच टेकाम म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्त्वात राजुरा विधानसभेत भाजपच्या वतीने सुरू असलेले सेवा व विकासकार्य बघून मी प्रभावित झालो आहे. विकासाची दृष्टी आणि सेवाभावी व्यक्तिमत्व असलेल्या देवरावदादांच्या कार्यशैलीची खरंतर आम्हाला भुरळ पडली आहे. त्यांच्या कनखर नेतृत्वातच आमच्या राजुरा विधानसभा क्षेत्राचा कायापालट होईल, असा विश्वास आम्हाला वाटतो.
भाजपाच्या लोककल्याणकारी व विकासाभिमुख कार्यशैलीवर विश्वास ठेवून श्री. अविनाश टेकाम यांनी भाजपात प्रवेश केला, त्यांच्या या विश्वासाला आम्ही कधीही तडा जावू देणार नाही. यासोबतच त्यांच्याच नेतृत्वात बामणवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहिल अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलतांना दिली.
यावेळी तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, तालुका महामंत्री बाळनाथ वडस्कर, बाबुराव जिवणे, मनोहर निमकर, भाऊराव बोबडे, विनोद नरेन्दुलवार, सुरेश धोटे, अभिजित कोंडावार, वैभव पावडे, रत्नाकर पायपरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.