गुरु श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५५ व्या जयंती निमित्य निघालेल्या भव्य शोभायात्रेचे माजी खासदार मा.श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदुर कॉग्रेस तर्फे युवा नेते श्री राहुलबाबू पुगलिया यांनी केले स्वागत.
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री गुरुव्दारा गुरुसिंग सभा महाकाली वार्ड यांच्या वतीने दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५५ व्या जयंती निमित्य चंद्रपूर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत बॅन्ड पथकासह शिख समुदयाचे शेकडो बांधव सहभागी होते. स्थानिक गांधी चौकात माजी खासदार मा.श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदुर कॉग्रेस तर्फे युवा नेते श्री राहुलबाबू पुगलिया यांनी श्री गुरु गोविदसिंगजी साहेब यांचे पंज पियारे यांना पुष्पहार घालून स्वागत केले. व श्री गुरुग्रंथ साहेब यांच्या पालखीचे दर्शन घेतले व विदर्भ किसान मजदुर कॉग्रेसच्या वतीने शोभायात्रेत सहभागी असलेल्या सर्वांना ज्यूस वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विदर्भ किसान मजदूर कॉग्रेसचे जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक अशोक नागापूरे, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, चंद्रशेखर पोडे, पंकज गुप्ता, स्वप्नील तिवारी कामगार युनियनचे, विरेंद्र आर्य, गजानन दिवसे, अनिल तुंगीडवार, सुधाकरसिंह गौर, रतन शिलावार, राजु लाहमगे, बाबूलाल करुनाकर, पृथ्वी जंगम, राजेंद्र शुक्ला, मनोज बावीस्कर, विनोद महंतो, शंकर महाकाली, , सुनील बावणे, अब्दुल हफिज, राजेंद्र गेलोत, संजय सुधाला, अमित आनेजा, अनिल ढोक, सुरज गरेवार व विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.