आंजी येथील सराईत दारू विक्रेता निवडणूक अनुषंगाने MPDA अंतर्गत नागपूर जेलमध्ये स्थानबद्ध
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन खरांगना हद्दीतील आंजी मोठी येथील सराईत दारू विक्रेता मुकेश उर्फ विनोद गोपीनाथ रेवतकर वय 38 वर्ष यास जिल्हा दंडाधिकारी श्री राहुल कर्डीले यांनी 01 वर्षासाठी नागपूर जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिनांक 13/11/24 रोजी निर्गमित केले. सदर आरोपी विरुद्ध 20 पेक्षा जास्त अवैध गावठी मोहा दारू विक्रीचे, मारहाणीचे, जुगाराचे गुन्हे दाखल होते. त्याला 2022 मध्ये वर्धा जिल्ह्यातून हद्दपार केले होते.
तरीही त्याने गुन्हे करणे सुरूच ठेवले. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे यांचे आदेशाने व सहायक पोलिस अधीक्षक श्री. राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन खरांगनाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे, पोलीस नाईक धीरज मिसाळ यांनी MPDA प्रस्ताव तयार करून पाठवला होता. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार संजय खलारकर, अमोल आणि पोलीस स्टेशन खरांगनाचे पो उप नि फडणवीस, अंमलदार विनोद सानप, मनीष वैद्य, अविनाश नवराते, अमर करणे, प्रवीण राठोड यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.