महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे मतदार जनजागृती अभियान
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तर्फे शाळा महाविद्यालयात जाऊन मतदान जनजागृती चे कार्य चालू आहे
चांदा ब्लास्ट
शाळेतील, महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांना मतदाना करिता जाण्यासाठी आग्रह धरावा, शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या माध्यमातून त्यांच्या घरी किती मतदार आहे व किती लोकांनी मतदान केले याबाबत विद्यार्थ्यांना चिठ्ठी देऊन ती माहिती गोळा करावी व शंभर टक्के मतदान करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चिठ्ठीतून प्रत्येक वर्गातून त्यांना प्रोत्साहन पर पुरस्कार द्यावे यामुळे मतदाराचा टक्का वाढून 100 टक्के मतदान पूर्ण होण्यासाठी विद्यार्थी हे आपल्या पालकांना प्रोत्साहित करेल.
चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी हे कार्य शाळेत जाऊन करीत असून चंद्रपूर बल्लारशा विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे श्री विवेक आंबेकर, सरिता सोनकुसरे, विकास नंदुरकर, प्रवीण पाचखेडे, संजय उपाध्ये, सौ शुभांगी डोंगरवार, दिलीप मेकलवार, सुधाकर डांगे, किशोर मोहरले व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अन्य सदस्य व पदाधिकारी कार्य करीत आहे.
या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मतदान जनजागृती अभिनव उपक्रमाला प्रत्येक शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी शंभर टक्के मतदान होण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे चंद्रपूर, बल्लारशहा विधानसभा शिक्षक परिषद प्रचार प्रमुख विवेक आंबेकर यांनी केले आहे