ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

येत्या १ आणि २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त आय.टी.आय मधील विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर हाती घेणार स्वच्छता मोहीम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित किल्ले सफाई मोहिम

चांदा ब्लास्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष, त्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व आय.टी.आय मधील विद्यार्थ्यांद्वारे शिवरायांना एक अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.  येत्या १ आणि २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त आय.टी.आय मधील विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम हाती घेणार आहेत.

वृत्तपत्र हा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे, आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून या अनोख्या उपक्रमाला आपले सहकार्य लाभेल, विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल अशी अशा आहे.

शिवराय म्हणजे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि त्यांचा वारसा जपण्याच्या या प्रामाणिक प्रयत्नात आपण देखील सहभाग घ्यावा, आपले अमूल्य योगदान द्यावे हि नम्र विनंती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये