ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोवंश तस्करी रोखण्यासाठी देऊळगाव राजा राजा पोलीस स्टेशनची नाकाबंदी शेकडो वाहनांची केली तपासणी

बाजार समितीला सुद्धा दिल्यास सक्त सूचना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या देऊळगाव राजा शहरांमध्ये आठवडी बाजारामध्ये पशुधनाचा सर्वात मोठा बाजार भरतो याचाच फायदा घेऊन गोवंशाची तस्करी करणारे तस्कर वाहतूक करत असल्याची प्राथमिक माहिती पोलीस स्टेशनला मिळाली त्यानुसार शनिवारी दिवसभर पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात आली. सविस्तर- आठवडी बाजारातून गोवंश तस्कर मोठ्या प्रमाणात खरेदी करून मुक्या प्राण्यांची निर्दयीपणे वाहतूक करत असल्याचे निदर्शनास येताच ठाणेदार ब्रह्मगिरी यांनी शहराकडे येणाऱ्या सिंदखेड राजा रोड, जालना रोड, जाफराबाद रोड, चिखली रोड , चोहो बाजूने नाकाबंदी करून शेकडो वाहनांची तपासणी केली. गुरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना सुद्धा बाजार समितीच्या पावती शिवाय पशुधनाची वाहतूक करता येणार नाही अशा पद्धतीच्या सक्त सूचना दिल्या.

बहुतांशी वेळी बाजार समितीच्या कर्मचाऱ्याकडून पावती देताना याच पावतीचा तस्कर गैरफायदा घेऊन एका पावतीच्या नावावर खूप मोठ्या पशुधनाची वाहतूक केल्या जाते यानंतर विक्रीस येणाऱ्या पशुधनाची प्रत्येकी पावती शिवाय वाहतूक करताना जर आढळले त्यांच्यावर सक्तीची कार्यवाही करण्यात येईल असे सांगून व व्यापारी तसेच बाजार समितीच्या संबंधित कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सूचना दिल्या.

झालेल्या नाकाबंदीमुळे बाजारात आलेले कित्येक व्यापारी हात हलवत परत गेल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. दर शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये सुद्धा जाऊन पाहणी करण्यात येईल असे सुद्धा पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस स्टेशन तर्फे दर शनिवारी सकाळी सहा ते उत्तर रात्रीपर्यंत मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी सांगितले. सदरची नाकेबंदी पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड आणि इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये