लखमापूर येथे बक्षीस वितरण सोहळा.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय लखमापूर यांच्या वतीने 02 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त भाषण स्पर्धा पार पडली होती त्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरीत नुकतेच करण्यात आले, कार्यक्रमात मुख्याध्यापक बंडु बुच्चे व वाचनालय सल्लागार रोशन भोयर यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बंडू बुच्चे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वाचनालय प्रमुख समाधान वासाडे,कु. उरकुडे मॅडम, खैरे मॅडम, अलावत सर, आलाम सर, चव्हाण सर उपस्थित होते.कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण देवाळकर, गौरव पिंपळशेंडे, वैभव भोयर, निशांत चौधरी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन रोशन भोयर यांनी केले व आभार प्रतिक पिंपळशेंडे यांनी मानले.