ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेड राजा व चिखली मतदार संघाकरीता निवडणूक निरिक्षक म्हणून नरेश झा नियुक्त 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

         विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीचा कार्यक्रम मा.राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 च्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे घोषित केला आहे. राज्यात एकाच टप्प्यामध्ये दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर मा. राज्य निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 23 चिखली व 24 सिंदखेड राजा या विधानसभा मतदार संघाकरिता मा.निवडणूक निरिक्षक (सामान्य) (General Observer) श्री. नरेश झा, हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9226152955 असा आहे व त्यांचे संपर्क अधिकारी श्री मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा हे असून मा.निरिक्षक यांचे निवासस्थान शासकीय विश्राम गृह, बुलढाणा येथे आहे. विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 23 – चिखली व 24 सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाकरीता उपरोक्त नमुद मा.निरिक्षक हे जिल्हयामध्ये दाखल झालेले असून कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरीकांची काही तक्रार असल्यास वरील क्रमांकावर सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत संपर्क साधता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी, 23 चिखली व 24 सिंदखेड राजा यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये