ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रविभवन नागपूर येथे रिपाइंची चिंतन बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 रविभवन, नागपूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भवितव्य काय असेल ? या विषयावर चिंतनशील कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन 20 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. जेष्ठ कार्यकर्ते आयु. हर्षवर्धन जाधव, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले.

सदर बैठकीत बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टीला प्रतिष्ठा मिळवून देणे बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते यांचे आद्य कर्तव्य आहे. म्हणून उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने बहुतेक उपस्थित कार्यकर्त्यांनी आपपले मत मांडून साधकबाधक चर्चा घडवून आणून विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कंस विरहित एकच असली पाहिजे.

चिंतन बैठकीत उपस्थित असलेले सर्व सहभागी कंसविरहित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होण्यास तयार आहेत.

कंस विरहित असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्यत्व पक्षाध्यक्ष यांच्याकडून दिले नाही तर सदस्यत्वासाठी जनआंदोलन उभे केल्या जाईल.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा लोकप्रतिनिधी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उभा करून निवडणूक लढविली जाईल.

असे ठराव संमत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आयु. संजय मनवर उमरेड यांनी केले.

याप्रसंगी हर्षवर्धन जाधव, मुंबई, संजय मनवर उमरेड, दिपाली चहांदे, सरीता सातारडे, उज्वला गणवीर, बाळू घरडे, चंद्रकांत गमरे रत्नागिरी, मेघराज काटकर चंद्रपूर, राजू नगराळे, सरोज मेश्राम, शिरीष धंदरे, अमरनाथ भांगे, डॉ. निर्मल सरदार अमरावती, देवानंद लांजेवार अमरावती, अशोककुमार उमरे गडचांदूर, दिनकर कांबळे कोल्हापूर, बाबासाहेब वडगावकर मुंबई, के. जी. सुर्वे मुंबई, रमेश जीवने यवतमाळ, दुर्वास चौधरी, विनायकराव जामगडे, सचिन गजभिये, एच. बी. जाधव,उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये