ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरचे पत्रकार जितेंद्र मशारकर यांचे ७७ वे रक्तदान

स्व. कुशलच्या जयंतीनिमित्त समाजाला प्रेरणादायी संदेश

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : रक्तदान हीच सर्वोत्तम समाजसेवा मानत चंद्रपूरचे पत्रकार जितेंद्र मशारकर यांनी आपल्या स्वर्गीय चिरंजीव कुशल यांच्या जयंतीनिमित्त ७७ वे रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. अनेक वर्षांपूर्वी मुलगा कुशलच्या वाढदिवशी रक्तदान करण्याचा त्यांनी घेतलेला संकल्प आजही ते तितक्याच निष्ठेने पाळत आहेत. सन २०२२ मध्ये मुलगा कुशलचे दुःखद निधन झाले, तरीही वैयक्तिक दुःखावर मात करत त्यांनी रक्तदानाची परंपरा अखंड सुरू ठेवली. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेमुळे चंद्रपूरमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती झाली असून अनेक युवक रक्तदानासाठी प्रेरित झाले आहेत.
        त्यांच्या सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाची दखल घेत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तकेंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचे डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक करत रक्तदान चळवळीला त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
      यावेळी रक्तकेंद्रात वैद्यकीय अधिकारी, छोटूभाई पटेल हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका माधवी कांत मॅडम (आई), डॉ. स्वाती देरकर (रक्त संक्रमण अधिकारी), डॉ. कोमल झटाले (कनिष्ठ निवासी डॉक्टर), डॉ. राहुल मडावी (कनिष्ठ निवासी डॉक्टर), राकेश शेंडे (समाजसेवा अधीक्षक), सुप्रिया ताजने (समाजसेवा अधीक्षक), गुरुदेव कुनघाडकर, अमुल रामटेके आणि रुपेश डहाळे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते किसन नागरकर यांनीही उपस्थित राहून जितेंद्र मशारकर यांचे अभिनंदन केले.
     जितेंद्र मशारकर यांचा रक्तदानाचा हा प्रेरणादायी प्रवास समाजाला एक महत्त्वाचा संदेश देतो—प्रतिकूल परिस्थितीतही समाजहिताचे कार्य अखंडपणे सुरू ठेवता येते. त्यांच्या समर्पणामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून रक्तदानाविषयी जनजागृती वाढण्यास मोठी मदत झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये