अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आयटकचे वर्धात आक्रोश जेलभरो आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात 2 जानेवारी 2024 रोजी दयाल नगर रेल्वे स्टेशन येथून विशाल मोर्चा काढून बजाज चौक येथे सरकारने कुठल्याही प्रकारचे दखल न घेतल्यामुळे संपाच्या तिसाव्या दिवशी एक तास रस्ता रोखून 3400 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभरो केले
मागील ४ डिसेंबर २०२३ पासून राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत
वाढत्या माहागाईनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ करा, दरमहा पेन्शन, आजारपणाचा रजा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी त्वरित लागू करा
नवीन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संपात व आंदोलनात जाता येत नाही असे आदेश दाखवा अन्यथा प्रकल्प स्तरावर तीव्र स्वरूपाचा ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला
अंगणवाडी उघडण्यासाठी सीडीपीओ व पर्यवेक्षिका यांच्याकडून दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे ते त्वरित बंद झाले नाही तर प्रकल्प कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे
नवीन लागलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपात जाऊ नये असा कुठे शासकीय आदेश असेल तर संघटनेला द्यावं जेणेकरून निर्णय करणे सोयीचे होईल
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला ग्रामपंचायत यांनी ठराव घेऊन तर शिक्षक संघटना, सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटना, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, आशा गटप्रवर्तक . ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, गुरुदेव मंडळ.इत्यादी संस्था संघटना यांनी दिलेल्या पाठिंबाबद्दल सर्वांचे आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन यांनी आभार व्यक्त केलेले आहे
आजच्या आंदोलनाचे नेतृत्व विजया पावडे वंदना कोळणकर मैना उईके शबाना पठाण मंगल इंगोले रंजना तांबेकर अरुणा बाराहाते रेखा कोठेकर कमल डबले करूणा शंभरकर कुसुम तडस चंदा मेश्राम ज्योती लोखंडे मीना ढोके वंदना वाचले शोभा सायंकाळ सीमा फुलझले सुलभा तिरभाने नीता येकोनकर इरफान पठाण मुक्ता खंडाते मंगला इंगोले सुरेखा रोहनकर माला भगत अलका भानसे सीमा गढिया वंदना रेवतकर सुनंदा आखाडे हिरा बावणे रंजना तांबेकर वंदना खोब्रागडे सविता तडस अरुणा नागोसे ज्योती फुलझले रेखा काचोळे अर्चना वाघमारे इत्यादींनी केले.