गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारूचा संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

             पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात नाईटगस्त पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, एक इसम सिल्वर ग्रे रंगाच्या ज्युपीटर मोपेड गाडीने दारूचा माल नंदुरी रोडने घेवून डांगरी वार्ड हिंगणघाट येथे वाहतूक करून घेवून येत आहे,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती प्रभारी ठाणेदार संतोष शेगावकर सा. यांना देवून त्याचे आदेशाने आंबेडकर शाळा चौक, हिंगणघाट येथे पोस्टाँप सह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली असता,

काही वेळाने तिथे एक इसम प्लाँस्टीक पन्यामध्ये दारूचा माल घेवून येतांना दिसल्याने पोलीस स्टाँफचे मदतीने ज्युपीटर गाडीला हात दाखवून थांबण्याचा इशारा दिल्याने त्याचे ताब्यातील वाहन थांबविल्यावर त्याने त्याचे नाव तुषार अशोकराव हुरले वय 19 वर्ष रा. डांगरी वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा असे सांगितले त्याचे जवळ असलेल्या वाहनांची पंचासमक्ष पाहणी केली असता वाहनाचा नोंदणी क्र. MH 32 AU 8287 किं. 80,000 रू सदर मोपेड वाहनाचे पायदनावर 5 प्लाँस्टीकच्या मोठ्या पन्नीमध्ये प्रिमीयम नं. 1 कोकण देशी दारूच्या 90 मिलीच्या एकून 500 शिश्या प्रती शिशी 100 रू प्रमाने 50,000 रू असा जू.किं. 1,30,000 रू चा माल विनापास परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला.

ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक नुरूल हसन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. व मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राहुल साठे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे, पोशी अमोल तिजारे यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये