Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

प्रा. डॉ. व्ही. के. चटप यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव कडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आवारपूर ता. कोरपना जि. चंद्रपूर येथील प्रा. डॉ. व्ही. के. चटप यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव कडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नुकताच विद्यापीठाच्या कार्यगौरव समारंभात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे, रजिस्ट्रार डॉ. विनोद पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

मागील वर्षी कार्यगौरव समारंभात २०२० सालचा उत्कृष्ट संशोधक (निधी) पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्यांना मागील कालावधीत भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून संशोधनासाठी २२/- लाखांचे अनुदान मिळाले असून त्यांचे शोधनिबंध विविध शोध पत्रिकांत प्रकाशित झाले आहेत. प्रा. डॉ. चटप यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिसंवाद व परिषदांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला आहे. यापूर्वी प्रा. चटप यांना ७१.९२ लाखांचे विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी व संशोधनासाठी अनुदान मिळाले असून त्यांनी विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा २०१४, २०१५ आणि २०१६ मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवत एस.व्ही.के.एम. संचालित एन.आय.एम.एम.एस., शिरपूर यांच्या एंटरप्रेनरियल आयडिया स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

२०१७ मध्ये जीएचआर लॅब अँड रिसर्च सेंटर पुणे यांचा’ बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड, २० व्या वार्षिक ए.पी.टी.आय. अधिवेशनात ए.पी.टी.आय. राज्य शाखा पुरस्कार, इंदूरच्या स्मृती कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन येथे ” यंग रिसर्चर अवॉर्ड” आणि इंदूरच्या मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स येथे ” यंग सायंटिस्ट अवॉर्ड” मिळाला असून त्यांच्या नावावर १० पेटंट नोंद आहेत तसेच एका युटिलिटी आणि डिझाइन पेटंटला मान्यता मिळाली आहे. तसेच त्यांना इंदूरच्या स्मृती महाविद्यालयात आयोजित झालेल्या शासनाच्या एन. एस. टी. एम. आय. एफ. डी. एस. टी. विभागाकडून कडून उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार मिळाला आहे.

डॉ. चटप हे आवारपूर ता. कोरपना जि. चंद्रपूर येथील श्री किसनराव चटप यांचे सुपुत्र असून ते सद्या शिरपूर येथील एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाचे फार्मासुटीक्स विभागात सहयोगी प्राध्यापक आणि ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये