पोलीस ठाण्यातअण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव संबंधित बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे आज दिनांक 28 जुलै रोजी श्रीमती मनिषा कदम उपविभागीय पोलिस अधिकारी दे राजा यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सबंधाने मीटिंग घेण्यात आली.
या मीटिंगमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ भाऊ साठे जयंती संबंधाने लावण्यात येणारे पोस्टर बॅनर मुळे कोणत्याही धर्माच्या भावना दुखणार नाही, या बाबत दक्षता घ्यावी.
वादग्रस्त गाणे लावू नये.,. मिरवणुकीमध्ये वापरण्यात येणारे झेंड्याचे पाईप लोखंडाचे तसेच मोठे ठेवू नये,
मद्य प्राशन करून मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊ नये.
मिरवणुकीमध्ये आपले स्वयंसेवक नेमावे.
मिरवणुकीमध्ये वेळेचे बंधन पाळावे.
पोलिसांच्या सूचनाचे पालन करावे.अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या, ठाणेदार आशिष रोही यांनी सुद्धा मार्गदर्शन केले,या बैठकीत उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य हजर होते.