ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे ‘आर्थिक संपत्ती व व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर – महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूरच्या वतीने “आर्थिक संपत्ती व व्यवस्थापन” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पुणे येथील आर्थिक सल्लागार चंद्रकांत तुरारे यांनी उपस्थित शिक्षकांना गुंतवणुकीसंदर्भातील विविध पर्यायांवर सखोल मार्गदर्शन केले.

चांगल्या आर्थिक नियोजनासाठी त्यांनी म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, फिक्स डिपॉझिट (एफ.डी.), शेअर बाजारातील गुंतवणूक (Stock Market), एसआयपी (SIP), सोन्यात गुंतवणूक, तसेच मालमत्ता खरेदी (Property Investment) यासारख्या महत्वाच्या बाबींचा ऊहापोह केला. गुंतवणूक करताना धोका व परतावा यातील समतोल साधण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. यासह त्यांनी आर्थिक शिस्तीचे महत्त्वही अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव होते. प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल माहूरे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. पवन चटारे यांनी केले. या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करण्याची प्रेरणा मिळाली, असे उपस्थितांनी नमूद केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये