४१ वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा मुंबई मध्ये ब्रम्हपुरीचे कराटेपटू चमकले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- मुंबई येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन दि. १३ जुलै २०२५ सेवा सदन वेल फेयर सेंटर चेंबूर, मुंबई येथे ITOSU RYU KARATE DO INDIA च्या द्वारे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील महाराष्ट्र राज्यातून ५०० खेळाडूंचा सहभाग होता.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिहान जोजी अब्राहम सर 7 TH BLACK BELT तसेच होशी बाटलीवाला, तसेच बुडो मार्शल आर्ट चे महाराष्ट्र प्रमुख शिहान लहू पारवे सर यांच्या द्वारे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील चंद्रपूर जिल्ह्यातून ब्रम्हपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्याथी -विद्यार्थ्यांनी भाग घेवून आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन सादर केले.
वरील स्पर्धक विदर्भ अम्युचर कराटे असोसिएशन या संस्थेच्या वतीने भाग घेऊन प्रथम स्थान प्राप्त केले. या मध्ये सेन्साई सुबोध आलेवार मुख्य प्रशिक्षक, रोहन वैरकर रजत पदक, सेहा कुत्तरमारे कास्य पदक, ख़ुशी पारधी कास्य पदक, सक्षम वासनिक कास्य पदक, अश्या प्रकारे वरील झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये उत्कृष्ट आपल्या कलेचे प्रदर्शन करून प्रथम स्थान प्राप्त करून आपल्या जिल्ह्याचे व ब्रम्हपुरी चे राज्यस्तरावर पोहचविले. वरील विद्यार्थ्यांचे मुख्य मार्गदर्शिका व संस्थेच्या कोषाध्यक्षा सेन्साई ज्योती मानुसमारे यांचे मार्गदर्शन लाभले.