सुनीताताई लोढिया यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून केला साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ नांदाच्या अध्यक्षा सुनीताताई विरेंद्र लोढिया यांचा वाढदिवस प्रभू रामचंद्र व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यासमवेत वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालयास वाढदिवसा निमित्य ग्रंथ भेट देऊन विशेष उपक्रम म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी गुरुकुल महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष पईनकर मंडळाचे सदस्य किसनजी गोंडे, प्रेमदासची पान घाटे,मनोहरराव झाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षकाने व कर्मचाऱ्याने आपला वाढदिवस ग्रंथालयाला ग्रंथ भेट देऊन साजरा करावा असे त्यांनी आवाहन केले.
अशाप्रकारे विविध कार्यक्रम आयोजित करून सौ. सुनीताताई लोढिया यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.