ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शूरवीरांना छोटुभाई पटेल हायस्कुलमध्ये आदरांजली

 चांदा ब्लास्ट

छोटुभाई पटेल हायस्कुल येथे २६ जुलै २०२५ रोजी शाळेच्या परिसरात कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शूरवीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच मातृभूमीसाठी लढणाऱ्या प्रत्येक जवानाला सलाम करण्यात आला.

याप्रसंगी छोटुभाई पटेल हायस्कुलच्या मुख्याध्यपिका सौ. कांत (वैद्य) मॅडम, उपमुख्याध्यापक मानकर सर, निबांळकर सर, कुंमरे मॅडम, माजी विद्यार्थी तथा गोंडपिपरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पराग जवळे, प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि शल्यचिकित्सक माजी विद्यार्थी डॉ. अनुप पालीवाल, धीरज साळुंके, सागर कुंदोजवार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व आभार शाळेचे शिक्षक बम सर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये