अवघ्या दोन तासात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी घेतले ताब्यात
शुल्लक कारणावरून मारहाण प्रकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संजय पडोळे
पोलीस स्टेशन मुल येथे दिनांक १३/१०/२०२४ रोजी फिर्यादी नामे श्री. बंडु परशुराम कामडे, वय ६४ वर्ष, व्यवसाय शेती तथा आटा चक्की रा. वार्ड.क्र. ७ पंचशिल वार्ड मुल ता. मुल यांनी तकार दिली कि, आरोपी नामे नरेन्द्र नामदेवराव कामडे त्याची पत्नी मनीषा नरेन्द्र कामडे असे मिळून त्याचा चुलत भाउ बबन मारोतराव कामडे यांचे सोबत दुचाकी बाजुला करून हातगाडी ठेला घेवुन जाण्याचे शुल्लक कारणावरून वाद झाल्याने त्याचे झगडा भांडण होवुन १) प्रेम चरण कामडे २) स्वप्नील सुभाष देशमुख हे गंभीर जखमी झाले तसेच ३) अविनाश चंद्रभान कामडे हे किरकोळ जखमी झाले यातील आरोपीतानी संगणमत करून बेकायदेशिर रित्या जिवानिशी ठार मारण्याच्या उददेशाने यातील जखमी इसमांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. अशा फिर्यादीचे तोडी रिपोर्ट वरून पो.स्टे. मुल अप. क्रमांक. ३८५/२०२४ कलम १८९, (२),१९१(२),१९१(३), १९०, १०९,६१(२) भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक साहेब, मुम्मका सुदर्शन, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. भगत याचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चद्रपुर येथील पोलीस निरीक्षक महेश कोडावार पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, सपोनि अविनाश आत्राम, पोउपनि बोरकर यांनी पो. स्टॉफचे मदतीने व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर याचे पथकांने तात्काळ सदर गुन्हयाचा बारकाईने तपास करून सदर गुन्हयातील आरोपीचा छळा लावुन शोध घेवुन आरोपी नामे १) राजेश बंडु खनके वय २६ वर्ष रा. पठाणपुरा चंद्रपुर २) सचिन बंडु खनके वय २७ वर्ष रा. पठाणपुरा चंद्रपुर ३) वैभव राजेश महागावकर वय २३ वर्ष पठाणपुरा चंद्रपुर ४) कपील विजय गेडाम वय २३ वर्ष, रा. पठाणपुरा चंद्रपुर ५) श्रीकांत नारायण खनके वय २८ वर्ष रा. पठाणपुरा चंद्रपुर ६) नरेन्द्र उर्फ नरेश नामदेव कामडे वय ४२ वर्ष, रा. मुल ता. जि. चंद्रपूर यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली. असुन सदर गुन्हयातील महिला आरोपी नामे ७) सौ. मनिषा नरेन्द्र कामडे वय २९ वर्ष रा. मुल हिला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर आरोपीतांनी गुन्हयात वापरलेली वॅगनार चारचाकी वाहन क्र. एम.एच.३४ ए.ए.४४२४ हि जप्त करण्यात असुन. सदर गुन्हाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी सा. याचे मार्गदर्शनात सपोनि अमितकुमार आत्राम करीत असुन सदर गुन्हयाचे तपासा करीता, पोउपनि भाउराव बोरकर, मपोउपनि वर्ष आत्राम, सफी उत्तम कुमरे, राधेश्याम यादाव, केवलराम उईके, डोये, पोहवा सचिन सायंकार, भोजराज मुडरे, जमिर शेख, राकेश फुकट, परवेज पठाण, पोअं आतिश मेश्राम, वेदनाथ करंबे, विशाल वाढई, तक्षशिल मेश्राम, संदीप चुदरी व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर पथक यानी अति परिश्रम घेवुन सदर गुन्हयातील आरोपीचा छळा लावुन सदर गुन्हातील सर्व आरोपीतांना तात्काळ अटक करण्यांत आली आहे.
पुढील तपास सुरू आहे. तरी मुल शहरातील नागरीकांना शांतता राखण्याचे मुल पोलीसान तर्फे आवाहान करण्यात येते.



