ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“बांधकामाकरीता वापरण्यात येणा-या लोखंडी प्लेटाची चोरी करणा-या गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

    हकिकत याप्रमाणे आहे कि, दि. 12/10/24 रोजी फिर्यादी नामे सचिन गुलाबराव डुकरे, वय 39 वर्ष, रा. शिरपुर रोड रेणुका माता मंदिर जवळ आर्वी, जि. वर्धा हे खाजगी ठेकेदार असुन, त्यांनी मौजा चोरांबा शिवारातील जिल्हा परीषद शाळेच्या समोर असलेल्या झाडाजवळ बांधकामाकरीता वापरण्यात येणा-या लोखंडी प्लेटा ठेवल्या होत्या, परंतु त्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत पो.स्टे. खरांगणा येथे दिलेल्या रिपोर्टवरून अप. क्र 848/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता व गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा चे पथक करीत होते.

सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा व अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना, दि. 12/10/24 रोजी त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारावरून मौजा पुलगाव बायपास रोडवरील नवाज ट्रेडर्स भंगार दुकानातुन आरोपीतांचे ताब्यातुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 34 लोखंडी प्लेटा कि. 2,76,000 रू व चोरीच्या मालाची वाहतुक करण्याकरीता वापरलेली एक पांढ-या रंगाची बोलेरो मालवाहु गाडी क्र. एम.एच. 32 ए.जे. 3896 कि. 6,00,000 रू असा जु.कि. 8,76,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मोक्कावरून 6 आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे नावे 1) अजय दिनेश झेले, वय 23 वर्ष, रा. ओकनाथ, पोस्ट- चिचोली, तह. धामणगाव (रेल्वे), जि. अमरावती 2) कुणाल राजेश देवगळे, वय 19 वर्ष, रा. ओकनाथ, पोस्ट- चिचोली, तह. धामणगाव (रेल्वे), जि. अमरावती 3) सोहेल शफी खान, वय 23 वर्ष, रा. कुरेशी मोहला आठवडी बाजार पुलगाव, तह. देवळी, जि. वर्धा, 4) शुभम शंकरराव फुगे, वय 28 वर्ष, रा. वडाळा, पोस्ट- सोरटा, तह. आर्वी, जि. वर्धा 5) इरफान शेख सलीम शेख, वय 23 वर्ष, रा. आठवडी बाजार पुलगाव, तह. देवळी, जि. वर्धा, 6) आकाश अरूण गेडाम, वय 34 वर्ष, रा. चित्ररा टॉकिज जवळ पुलगाव, तह. देवळी, जि. वर्धा, असे आहे. व आरोपी नामे 7) नईम शेख (पसार), 8) अंकुश शेंडे (पसार), 9) संदीप ठाकरे (पसार) हे अद्याप पावेतो पसार असुन, त्यांच्या शोध घेणे सुरू आहे. सर्व आरोपीतांच्या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न करण्यात आला असुन, आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी पो.स्टे. खरांगणा यांचे ताब्यात देण्यात आले.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. उमाकांत राठोड, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, विनोद कापसे, अभिशेक नाईक, गोविंद मुंडे, राहुल अधवाल, शुभम राउत सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये