ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“शेत मालाची चोरी करणा-या गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 08/10/24 रोजी फिर्यादी नामे त्र्यंबक बापुराव मसराम रा. तळणी भागवत तह. देवळी यांनी त्यांचे शेतातमध्ये सोयाबिन काढुन ते चुंगड्यांमध्ये भरून शेतात ठेवलेले होते, दि. 09/10/24 रोजी ते शेतात गेले असता, त्यांना सोयाबिन मिळुन न आल्याने, ते कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे त्यांना समजुन आल्याने, त्यांनी पो.स्टे. पुलगाव येथे चोरीबाबत रिपोर्ट दिल्यावरून, अज्ञात आरोपीविरूध्द पो.स्टे. पुलगाव येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक करीत होते, दि. 10/11/24 रोजी त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीचा आधारे आरोपी नामे 1) शुभम शंकर फुगे, वय 28 वर्ष, रा. वडाळा, तह. आर्वी, जि. वर्धा 2) अंकुश विलास शेंडे, वय 30 वर्ष, रा. नाचणगाव, तह. देवळी, जि. वर्धा 3) भारत सुनिल बुरबुरे, वय 25 वर्ष, रा. तळणी भागवत, तह. देवळी 4) बादल राहुल थुल, वय 20 वर्ष, रा. तळणी भागवत, तह. देवळी 5) आदेश प्रमोद पाटिल, वय 30 वर्ष, रा. पार्डी, तह. कळंब, जि. यवतमाळ यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असुन, चोरी केलेले सोयाबिन आरोपीतांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी येथील आडत्या/दलाल यांचेकडे विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने, कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी येथुन 10 क्विंटल 25 किलो सोयाबिन, प्रती क्विंटल 3675 रू प्रमाणे 37,668 रू चा मुद्देमाल जप्त केले तसेच सदर गुन्ह्यातील चोरी केलेल्या मालाची वाहतुक करण्याकरीता वापरलेली महिंद्रा मॅक्सीमो मालवाहु गाडी क्र. एम.एच. 32 क्यु. 1762 कि. 3,00,000 रू असा जु.कि. 3,37,668 रू चा मुद्देमाल जप्त करून, गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून, गुन्हा उघडकिस आणुन, जप्त मुद्देमाल व आरोपीतांना पो.स्टे. पुलगाव यांचे ताब्यात देण्यात आले.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. उमाकांत राठोड, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, विनोद कापसे, अभिषेक नाईक, गोविंद मुंडे, रितेश गेटमे, राहुल अधवाल, शुभम राउत सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये