ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाचा शोध सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

नागपूर चंद्रपूर मुख्य मार्गावरील कोंढा फाट्याजवळ ट्रक पंचर असल्याने रस्त्याच्या खाली उतरलेल्या ट्रक चालकाचा अज्ञातवाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारला मध्यरात्री घडली याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माणिकराव आत्राम वय 38 वर्ष राहणार गोड गुंडा तेलंगाना असे मृतकाचे नाव आहे हा ट्रक क्रमांक एम एच ४० बी जीo९२३नी सिमेंटच्या बोऱ्या घेऊन देवापुर वरून नागपूरकडे जात असताना कोंढाफाट्याजवळ त्याचा ट्रक पंचर झाला त्यामुळे तो खाली उतरून इकडे तिकडे बघावयास गेला असता त्याला मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिली यात त्याचा जागीच मृत्यू झाला

या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संतोष वर्मा अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये