ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर पोलिसांनी पकडला घातक हत्यारचा साठा

सहा तलवार एक भाला एक कुकरी जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-येत्या नवरात्री विसर्जन दिवाळी सन उत्सव बघता कोणतीही अनुचित घटना घडू नये करिता गुन्हेगार प्रवृत्तीत शामिल संशयित गुन्हेगारावर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे त्या अनुसंघाने पोलिसांना माहिती मिळाली की एका घरी घातक हत्यारे चा जाखीरा ठेवला आहे अशी माहिती पोलीस विभागाचे गुप्तहेर यांनी माहिती दिली की वस्ती विभाग मधील श्रीराम वॉर्ड येथील आकाश उर्फ पिंटू प्रमोद बरडे यांचे राहते घरी कायदेशीर रित्या धाड टाकून झडती घेतली असता सहा तलवार एक भाला एक कुकरी असा घातक हतीयार मिळून आला.

पंचा समक्ष जप्त करून पो.स्टेला अप. क्र 945/2024कलम 4.25 भारतीय कायदानव्ये गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईत एकूण दोन आरोपी प्रमोद श्रीहरी बरडे (58),आकाश उर्फ पिंटू प्रमोद बरडे (30)दोन्ही राहणार श्रीराम वॉर्ड बल्लारपूर. यांना अटक करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ अधिकारी यांचा मार्गदर्शनातं बल्लारपूर चे ठाणेदार सुनील गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक टोपले,हुसेन शहा,गजानन डोईफोडे, आनंद परचाके, संतोष दंडेवार इतर पोलीस कर्मचारी यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये