ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेती चोरी करून वाहतूक करणारे सात (07) ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीसह एकुण 50 लाख 81 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        दिनांक 09/10/24 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील दोन पथक हिंगणघाट डिव्हिजन परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, वणा नदी पात्राचे कवळघाट व पारडी नगाजी येथील रेतीघाटातुन ट्रॅक्टरचे ट्राँलीद्वारे रेती चोरी करून हिंगणघाटकडे घेऊन जात आहे. अशी माहिती मिळाल्याने पेट्रोलिंग दरम्यान दोन वेगवेगळे पथक तयार करून वणानदी पात्राचे कवळघाट व श्री संत नगाजी महाराज पारडी रेतीघाट परिसरातून हिंगणघाट कडे येणाऱ्या रोडवर नाकेबंदी केली असता, नाकेबंदी दरम्यान वणा नदी कवळघाट कडून हिंगणघाट कडे येतांना चोरीच्या रीतीने भरलेले चार ट्रॅक्टर ट्रॉली सह व नगाजी महाराज पारडी येथील रेती घाटातून हिंगणघाटकडे येताना तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीची ओली काळी रेती भरून वाहतूक करीत असतांना नाकेबंदी दरम्यान मिळून आल्याने आरोपी नामे 1) ट्रॅक्टर चालक – राजेश सूर्यभान पढाळ, वय 48 वर्ष, राहणार गाडगेबाबा वार्ड, हिंगणघाट, 2) ट्रॅक्टर मालक – राजेंद्र मधुकर उपाध्ये रा. तेलीपुरा चौक (पसार), 3) ट्रॅक्टर चालक – नरेश आनंदराव रामटेके, वय 48 वर्ष, रा. मजुमदार वार्ड, हिंगणघाट, 4) ट्रॅक्टर मालक – दीपक पांडुरंग सुरकार, रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट (पसार), 5) ट्रॅक्टर चालक – संजय शंकरराव कुडसंगे, वय 45 वर्ष, रा. कांदापूर, हिंगणघाट, 6) ट्रॅक्टर मालक – स्वप्निल देविदास सुरकार, रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट (पसार), 7) ट्रॅक्टर चालक – गजानन हरिदास मोरे, वय 35 वर्ष, रा. गाडगेबाबा वार्ड, हिंगणघाट, 8) ट्रॅक्टर मालक – जीतेंद्र ब्रिजमोहन चव्हाण, रा. टिळकवार्ड हिंगणघाट (पसार), 9) ट्रॅक्टर चालक – संजय गजानन पाहुणे, वय 27 वर्ष, रा. संत कबीरवाड हिंगणघाट, 10) चंद्रकांत शंकरराव मुंढोळकर, वय 24 वर्ष, रा. पिंपळगाव ता. हिंगणघाट जि. वर्धा, 11) मनोज तुकाराम मेश्राम, वय 32 वर्ष, रा. पिंपळगाव ता. हिंगणघाट जि. वर्धा, 12) ट्रॅक्टर मालक – निलेश ठोंबरे (पसार) रा. हिंगणघाट, 13) ट्रॅक्टर मालक – सौरभ पांडे (पसार) रा. हिंगणघाट हे आरोपी त्यांचे ताब्यातील सातही ट्रॅक्टरद्वारे शासनाचा कोणताही पास परवाना ( रॉयल्टी ) नसतांना अवैधरित्या विना पास परवाना ओल्या काळ्या रेतीची वाहतूक करीत असतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून दोन वेगवेगळ्या कार्यवाहीतून सात ट्रॅक्टर, ट्रॉली व 7 ब्रास (700फुट) रेतीसह *एकुण 50,81,500/- रुपये चा मुद्द्यामाल जप्त करण्यात आला. सदर नमुद आरोपीचे विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दोन वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले.

       सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउनि उमाकांत राठोड पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, महादेव सानप, रामकिसन ईप्पर, अमोल नगराळे, विकास मुंढे, अरविंद इंगोले, सुगम चौधरी, रितेश गेटमे, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा* यांनी केली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये