ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“स्थानिक गुन्हे शाखा वर्धा कडून पो स्टे रामनगर हद्दीतील खंडणी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी महेश ठाकूर यास शोध घेऊन नागपूर येथून ताब्यात

चंदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      दिनांक 23/09/24 रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथे फिर्यादी निलेश दिलीपभाई मांडवीया रा. मालगुजरीपुरा वर्धा यांनी रिपोर्ट दिली की, वरील घटना तारीख वेली स्थळी फिर्यादी याला पैशाची गरज असल्याने आरोपी क्रमांक 02 अनमोल बेद यांचे ओळखीचा आरोपी क्रमांक महेश ठाकूर यांच्याकडून सात लाख रुपये व्याजाने घेतले होते, फिर्यादीला पुन्हा पैशाची गरज पडल्याने त्याने आरोपी महेश ठाकूर यांच्याकडून 20 लाख असे एकूण 27,00,000 रुपये व्याजाने घेतले त्या रकमेचे 08 टक्के प्रमाणे तो पैसे आरोपी महेश ठाकूर याला देत होता. आरोपी महेश ठाकूर हा फिर्यादीस त्याचे व्याजाने दिलेले पैसे व मुद्दल हे 80,00,000 रू झाले असे म्हणुन परत कर नाही तर शेअर्स ची नोटरी करून दे असा तगादा लावला फिर्यादीकडे पैसे नसुन जास्त पैसै मागत असल्याने व त्यास वेळोवेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अप. क्र:-799/2024 कलम 308(5) 351,352(2) ,(3),3(5) भारतीय न्याय संहिता सहक 39,45,46 सावकारी अधिनियम अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 सदन गुन्हा दाखल होताच गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश ठाकूर हा फरार झाला होता. यांचे शोध बाबत मा. श्री अनुराग जैन पोलीस अधीक्षक यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यानी समांतर तपास सुरू करून वेगवेगळे पथके तयार करून आरोपी महेश ठाकूर याचा जिल्हा नागपूर, छिंदवाडा जबलपूर, सतना, मध्य प्रदेश या परिसरात आरोपीचा शोध घेतला. आरोपी महेश ठाकूर याचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी महेश ठाकूर हा दिल्ली येथून कोणत्यातरी रेल्वे गाडीने नागपूर येथे येत असल्याची माहिती वरून नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात आरोपीचा शोध करिता स्थानीक गुन्हे शाखा चे वेगवेगळे पथके तयार करुन दिल्ली वरून येणारे रेल्वे प्रवाशांवर पाळत ठेऊन आरोपी महेश उजागरसिंग ठाकूर वय 5वर्ष रा. तुकाराम वार्ड रामनगर वर्धा हा मिळून आल्याने त्यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

सदर कारवाई मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात – श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.उप.नि. अमोल लगड, स फौ संतोष दरगुडे, मनोज धात्रक पो.हवा. गजानन लामसे, अरविंद येनुरकर, रितेश शर्मा, राजेश तिवस्कर, श्रीकांत खडसे, भूषण निघोट,पोलीस अंमलदार गोपाल बावनकर, मंगेश आदे, अक्षय राऊत सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये