ताज्या घडामोडी

आ. सुभाष धोटेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शेतकरी, शेतमजूर तसेच कार्यकर्त्यांच्या भव्य मेळावा - काँग्रेस महासचिव मुकुल वासनिक व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राहणार उपस्थित

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, राजुरा च्या भव्य पटांगणावर गुरुवार दिनांक १० आक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ : ३० वाजता भव्य शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस कार्यकर्ता मेळावा तसेच अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक अ. भा. काँग्रेसचे महासचिव खा. मुकुल वासनिक, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ. नाना पटोले, विशेष अतिथी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रमुख अतिथी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, प्रमुख पाहुणे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यानिमित्ताने होणाऱ्या अभिष्टचिंतन सोहळ्याला राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेने बहुसंख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमेटी, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, किसान काँग्रेस, ओबीसी काँग्रेस, अनुसूचित जाती विभाग, अनुसूचित जमाती विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस, एन एस यु आय तथा काँग्रेसचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन तालुका राजुरा, जिवती, कोरपना, गोंडपिपरी च्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये