ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी दारू व दुचाकी वाहणासह 93 हजाराचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे येथील पथकाने आज दिनांक 10/10/2024 रोजी त्यांना खास मुखबिर कडुन माहीती मिळाले की, हरीदास घंगारे हा त्याचे मोपेडे अॅक्टीवा गाडीने त्याचा नौकर नेमेश उर्फ नेहुल बेलखोडे यांचे मदतीने देशी दारूचा माल घेवुन बोरगाव (बेलोडी) गावाचे रस्त्याने रेल्वे पुलाचे खालुन हेलोडी मार्गे सिंदी रेल्वे गावात येणार आहे. अशी माहीती प्राप्त झाल्याने पोलीस स्टॉफचे मदतीने नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता आरोपी हरीदास घंगारे हा मौक्यावरून पसार झाला. आरोपी नेमेश उर्फ नेहुल राजु बेलखोडे वय 23 वर्ष रा. सोनामाता नगर पिपरा रोड सिंदी रेल्वे याचे ताब्यातुन दोन पंचासमक्ष 1) एक जुनी वापरती होंन्डा कंपनिची अॅक्टव्हा मोपेड डार्क ब्लु रंगाची गाडी क्र. एम. एच. 32 ए. वी. 3085 किंमत अंदाजे 75,000रू 2) एका मोठ्या पिशवीत लहान मोठ्या तिन खर्रडयाचे खोक्यात 180 एम.एल. च्या काचेच्या सिलबंद देशी दारूने भरून असलेल्या संत्रा लावणी कंपनिच्या एकुण 120 शिश्या प्रति नग 150रू प्रमाणे 18,000रू असा एकुण जु. किंमत 93,000रू चा माल मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही करून आरोपी विरूध्द अपराध क्रमांक 0344/24 कलम 65 अई, 77 अ, 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 3 (1) 181, 130/177 मोटार वाहण कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन सा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रमोद मकेश्वर सा. याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरिक्षक संतोष दरेकर पो.स्टे सिंदी रेल्वे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रफुल डफ, आनंद भस्मे, पो.शि. कांचन चाफले, नितीन नखाते, उमेश खामनकर संदेश सयाम, समीर आगे, सचिन उईके सर्व नेमणुक पो.स्टे. सिंदी रेल्वे यांनी केलेली आहे.

(संतोष व्हि. दरेकर ) ठाणेदार, पो.स्टे. सिंदी रेल्वे जि. वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये