ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्त्यावरील खड्यावर उपाययोजना करा!

भाजयुमोचे मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच इतर वार्डात रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने नागरिकाना ये-जा करीत असताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मागणीला घेऊन नगर परिषदेने तात्काळ उपाय योजना करावी अन्यथा जनहीतार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव रुपेश मांढरे यानी निवेदनातून केला आहे.

   शहरातील झिंगुजी महाराज मठ ते नगर परिषद पर्यंत मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनेकदा अपघात झालेत. त्याचप्रमाणे शहरातील विविध वार्डात रस्ता कमी आणि खड्डे जास्त असून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन ते जुना बस स्टँड रोड, जामा मस्जिद ते बंगाली कम्प रोड असे अनेक रस्ते खड्डेमय झाले आहे .नगर परिषद ने या रस्त्यांची तात्काळ डागडुजी करावी. तसेच न.प.द्वारा कराच्या स्वरूपात आर्थिक वसूली करून मुद्दती नंतर एक दिवस लोटला तरी रकमेवर व्याज लावून कराची वसूली केली जात आहे. ज्याचा भुर्दंड शहरातील नागरिकांना सोसावा लागत आहे. या समस्यांवर नगर पालिकेने जातीने लक्ष देवून शहरातील नागरिकाना सोई सुविधा पुरविण्यात याव्यात. अशा आषयाचे निवेदन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव रुपेश मांढरे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना देण्यात आले.

 याप्रसंगी पवन नागपुरे, भाजपा मछीमार् आघाडी जिलाध्यक्ष संतोष नागपुरे, अर्जुन लांजेकर, विकास सोनवणे, प्रफुल भोसकर, योगेश नागपुरे, उत्तम पोईनकर, आकाश नागपुरे, अभिषेक घुबडे, प्रशांत लांडगे, पवन नागपुरे, बोलू कामतवार, विशाल मडावी अनिल रुयारकर आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये