नागभीड प्रादेशिक वन विभागाच्या वतीने वन सप्ताह १ ऑक्टोंबर ते ७ ऑक्टोंबर पर्यंत साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
ब्रम्हपुरी वन विभागाच्या नागभीड येथील प्रादेशिक वन विभागाच्या वतीने १ ऑक्टोंबर ते ७ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत विविध उपक्रम हाती घेऊन साजरा केला जाणार आहे.
नागभीड प्रादेशिक वन विभागाच्या वतीने १ ऑक्टोंबर रोजी वन्य प्राण्यांची माहिती देऊन वन्य प्राणी आपल्याला किती महत्त्वाचे आहे. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, याप्रमाणे वणे आम्हाला पाणी, फुले, फळे आणि लाकडे देत मानवाला शुद्ध हवा देत निरोगी राहण्यासाठी प्राण वायू देत असतात. वणामुळे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात जंगलात वावरत असल्याने वृक्ष तोड होत नाही यामुळे सतत पाऊस पडत असल्याने शेतकरी बळीराजा धान्य पीक मोठ्या प्रमाणात घेत असतात. प्रादेशिक वन विभागाच्या वतीने जमिनीवर विविध प्रकारचे प्राणी अस्तित्वात आहेत त्यांना आपले जीवन आनंदमय जगता यावे
याकरिता वन विभागाच्या वतीने दररोज विविध उपक्रम घेऊन वन्य जीवाचे महत्त्व जंगल परिसरात असणाऱ्या जनतेला त्याचे महत्त्व पटवून देत आहे. नागभीड येथील प्रादेशिक वन विभागचे वन अधिकारी कन्नमवार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक क्षेत्र सहाय्यक सय्यद शेख, नेरालावार, तावडे हे आपले वनरक्षक यांचे मदतीने वन सप्ताह साजरा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.