ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव राजाचे क्रीडा क्षेत्रात नेत्र दीपक यश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिद्धिविनायक टेकनिकल ट्रेनिंग कॅम्पस खामगाव रोड शेगाव येथे १ ऑक्टोबर रोजी आयोजित जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धेत आपल्या एमसीव्हीसी कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग अकरावी शिकणारा विद्यार्थी विशाल विकास घाडगे हा 80 किलोग्रॅम वजन गटातून कुस्तीमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी झाला असून त्याची निवड विभाग स्तरावर झालेली आहे.
सदर खेळाडूचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोषाध्यक्ष सचिव तथा संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री आर बी कोल्हे सर पर्यवेक्षक श्री डी.व्ही.जाधव सर श्री एस व्ही मुळे सर यांनी पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच विभाग स्तर क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.