Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव राजा जिल्ह्यात अव्वल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा व कनिष्ठ महाविद्यालय चे सहाय्यक शिक्षक श्री योगेश रामदास गव्हाळे यांनी इयत्ता सहावी ते आठवी विज्ञान विषयामध्ये आणि श्री संतोष सुगनचंद ललवाणी यांनी इयत्ता नववी ते दहावी गणित विषयांमध्ये शैक्षणिक व्हिडिओचे सादरीकरण केले.

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शासन संशोधन व परिषद च्या वतीने राबविण्यात आलेल्या शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चे आयोजन मागील वर्षी करण्यात आले होते. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीने शिकवावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेवरील शिक्षकांसाठी वेगवेगळ्या गटांमध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शिक्षकांनी स्वनिर्मित दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ तयार करून शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केल्या गेले होते. यामधून तालुका, जिल्हा, राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली होती.

देऊळगाव राजा शिक्षण संस्था देऊळगाव राजा संचालित देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दे.राजा चे शिक्षक श्री योगेश रामदास गव्हाळे यांनी इयत्ता सहावी ते आठवी विज्ञान विषय या गटामधून इयत्ता सहावी मधील पाठ-8 वा-“स्केलेटल सिस्टम ” यावरती आणि श्री संतोष सुगनचंद ललवाणी यांनी नववी ते दहावी गणित या विषयांमध्ये ‘टू फाईंड व्हाल्युम कॅपॅसिटी’ या घटकावरती स्वनिर्मित दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओचे सादरीकरण केले होते. या दोघांच्या व्हिडिओला तालुका स्तरावरून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच श्री योगेश गव्हाळे सर यांच्या व्हिडिओला जिल्हास्तरावरून तृतीय क्रमांक प्राप्त झाला आणि श्री संतोष ललवानी सर यांच्या व्हिडिओला जिल्हास्तरावरून प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.

हे दोन्ही शिक्षकानी कोरोना काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने प्रेरित होऊन तसेच मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने युट्युब वरती विविध शैक्षणिक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आणि सातत्याने ऑनलाइन मार्गदर्शन ते विद्यार्थ्यांना करत असतात. त्यांनी केलेल्या कोरोना काळातील कार्याची पावती म्हणजेच या राज्यस्तरीय शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतून त्यांना मिळाली आहे .त्यांच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे आदरणीय अध्यक्ष,कोषाध्यक्ष,सचिव आणि संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक यांनी कौतुक केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये