Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

1 वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीचे अपनयन करणाऱ्या आरोपीस पुणे येथून अटक

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर असे की, अल्पवयीन पिडीत मुलगी तिच्या आईवडीलांसह सिंदी मेघे परिसरात राहत होती व दहाव्या वर्गात शाळा शिकत होती.घटनेच्या रात्री ती घरीच अभ्यास करीत असतांना रात्री 01.00 वा. चे सुमारास तीचे वडिलांना जाग आली तेव्हा त्यांना यातील पिडीत मुलगी घरी दिसून आली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोध घेतला असता, ती मिळून आली नाही. त्यामुळे तीला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून तिच्या पालकांचे कायदेशीर रखवालीतून तिचे अपनयन केले आहे.

अश्या तक्रारीवरून पो. स्टे. रामनगर येथे सदरचा गुन्हा नोंद करून तपासावर घेण्यात आला होता.

    प्रथमत: सदर गुन्ह्याचा तपास रामनगर पोलीस स्टेशनद्वारे करण्यात आला. त्या दरम्यान असे आढळून आले की, यातील आरोपीने पिडीत मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून व तिचेशी जवळीक साधून तीचे अपनयन केले आहे. त्यामुळे त्याला सदर गुन्ह्यात आरोपी करून पुढील तपास करण्यात आला .

           घटनेपासून यातील आरोपी अल्पवयीन पिडीत मुलीला घेऊन फरार असून त्यांचा शोध न लागल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे आदेशान्वये दि.16.07.2024 रोजी सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर कडून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा कडे वर्ग करण्यात आला होता.

       अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे अंमलदार यातील आरोपी व पिडीत मुलीचा सातत्याने शोध घेत असतांना, गोपनीय माहिती मिळाली की,यातील आरोपी व पिडीत मुलगी हे दोघेही चाकण, पुणे परिसरात किरायाची रूम घेऊन राहत आहे व आरोपी हा MIDC मधील स्कोडा कंपनीत काम करीत आहे. अशा माहितीवरून दि.30.09.2024 रोजी यातील शोध पथकाने पोलीस स्टेशन म्हाळुंगे, पुणे शहर हद्दीतील चाकण परिसरात जाऊन प्राप्त माहितीनुसार छापा घातला असता, यातील पिडीत मुलगी व आरोपी हे दोघेही किरायाने घेतलेल्या एका रूममद्धे मिळून आलेत. त्यांना रितसर ताब्यात घेऊन व वर्धा येथे आणून त्यांना पुढील तपासकामी पो. स्टे. रामनगर येथे हस्तान्तरीत करण्यात आले.

           तपासात यातील आरोपीने अल्पवयीन पीडित मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे आढळून आल्याने त्याचे विरुद्ध भा दं वि चे कलम 376(2)(एन ) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम चे कलम 4,6 अन्वये* गुन्ह्यात कलम वाढ करून व त्यास अटक करून सदरचा गुन्हा पुढील तपासकामी पोक्सो सेल वर्धा कडे हस्तान्तरीत करण्यात आला आहे. पोक्सो सेलद्वारे पुढील तपास सुरु आहे.

       सदरची कामगिरी मा. श्री अनुराग जैन,पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, पो. नि. श्री विनोद चौधरी, स्था. गु. शा., स. पो. नि.माधुरी वाघाडे, पो उप नि बालाजी लालपालवाले यांचे मार्गदर्शनात स. फौ. निरंजन वरभे,नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे,अर्चना फुटाणे, दिनेश बोथकर व गोविंद मुंडे यांनी पार प्रत्यक्षरित्या पाडली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये