Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांधीजींच्या विचारांना आत्मसात करून विकासाचा विळा उचलावे – कुसुमताई अलाम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

भारतातील बहुतांश लोकांनी गांधीजींना समजले नाही पुढारी, अधिकारी व विद्यार्थी गांधीजींच्या नावाचा जयजयकार करतात. पण गांधीजींच्या विचारांना समजले नाही. गांधीजीची अपेक्षा होती की, समाजातील प्रत्येक घटकाला व शेवटच्या माणसाला किमान गरजा अन्न, निवारण, वस्त्र मिळाले पाहीजे. पण स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले तरी आतापर्यंत या गरजा पूर्ण झालेल्या नाहीत तरी माझ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी गांधीजीच्या विचारांना आत्मसात करून या देशाचा विकासाचा विळा उचलावे, असे आव्हान श्रीमती कुसुमताई अलाम आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय येथे व्यक्त केले आहे.

महात्मा गांधी जयंती निमित्य राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय व राष्ट्रपिता महात्मा गांधी विचार मंच सावली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता हीच सेवा’ सप्ताह दिनांक 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत साजरा करण्यात आले. या सप्ताहा अंतर्गत स्वच्छता, महात्मा गांधींच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा, दैनंदिन जीवनात ज्ञानाचे महत्व, स्वच्छता जागृती रैली अशाप्रकारचे विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा सांगता समारोप आज दिनांक 02 ऑटोबर 2024 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे संस्थेचे सचिव आद. राजाबाळ पाटील संगीडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजीक कार्यकर्त्या गांधी विचारवंत व कवयित्री श्रीमती कुसुमताई अलाम होत्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष आद डॉ. विजयराय शेंडे अंकुर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आद. प्रभाकरराव गाडेवार, राष्ट्रपिता महात्मा गांधी विचार मंचचे अध्यक्ष आद. सुधाकरराव गाडेवार, सचिव श्री कोलप्याकवारजी हे होते. वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. चंद्रमौली यांनी केले. संचालन प्राध्यापिका खोब्रागडे मॅडम, आभार प्रदर्शन डॉ. दिवाकर उराडे सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. देविलाल बताखेरे, डॉ. राजश्री मार्कडेवार, तथा महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ अशोक खोब्रागडे, प्रा. वासाडे सर, डॉ कामडी सर, प्रा. देशमुख, प्रा. बागडे, प्रा बडवाईक, डॉ. पवार सर, डॉ रागीनी पाटील, डॉ सचिन चौधरी, प्रावाकडे व अन्य प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये