Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छता रैली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्य राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, राष्ट्रपिता महात्मा गांधी विचार मंच व नगरपंचायत सावली च्या वतीने स्वच्छतेचे भव्य रॅली काढण्यात आली.

रैलीची सुरुवात महाविद्यालयाचे प्रांगणातून सावलीच्या नगराध्यक्षा श्रीमती लताताई वाळके, साथली पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री पुल्लुरवार साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डी.ए. चंद्रमौली सर यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. रैलीमध्ये सहभागी बहुसंख्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा नारा देत रैली बाजार चौकातून चरखा संघ मार्गेगुजरीत्तील महात्मा गांधी स्मारक येथे पोहचले व गांधीजीच्या पुतळ्याला सुतमाला अर्पण करून रैलीतील सहभागी विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र विभागाच्या वतीने स्वच्छतेवर आधारीत पथनाटय सादर केले. तिथून रैली सावली शहरातून बसस्टैंड मार्गे महाविद्यालयात पस्त आले. रॅली व्यवस्थित पार पाढण्यासाठी पोलीस विभागाचे सहकार्य लाभले.

यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली, राष्ट्रपिता महात्मा गांधी विचार मंचचे अध्यक्ष श्री सुधाकररावजी गाडेवार सचिव श्री कोलप्याकवारजी व इतर सदस्य अंकूर बहुउद्दीय संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकररावजी गाडेवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. देविलाल बताखेरे, डॉ राजश्री मार्कडेवार, महाविद्यालयातील प्रध्यापक डॉ. दिवाकर उरावे, डॉ. अशोक खोब्रागडे, प्रा. वासाचे सर डॉ. कामठी सर, प्रा. देशमुख, प्रा. बागडे, प्रा बढ़वाईक, डॉ. पवार सर, डॉ. रागीनी पाटील, डॉ. सचिन चौधरी, प्रा.वाकडे व अन्य प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी रॅलीत सहभाग दर्शविला

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये